गणेश कारखाना निवडणूक: थोरातांची महत्वकांक्षा पण कोल्हेंची राजकीय सुसाईड

गणेश कारखाना निवडणुक: विखे - थोरात वादात कोल्हेंचे राजकारण संपुष्टात..?

संपादकीय: सहदेव जाधव 

राहाता: गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असून गेली कित्येक दिवसांपासून कोल्हेंचे वर्चस्व असलेला हा कारखाना मागील काही वर्षांपासून विखे पाटील यांनी चालवायला घेतला आहे. आता या कारखान्यावर थोरातांचा डोळा असून त्यांनी कोल्हेंच्या माध्यमातून विखेंना शह देण्याचे ठरविले आहे. यात आता थोरातांनी प्रथमच थेट सीमोल्लंघन करण्याचे धाडस दाखवले आहे. यात थोरातांचा राजकीय सुड उगविण्याचा नाममात्र इच्छाकांक्षा असून खरे नुकसान मात्र कोल्हेंचेच होणार आहे.

           काही काळापुर्वी गणेश वर शंकरराव कोल्हे यांचे वर्चस्व होते. मात्र आजची परिस्थिती ही वेगळी आहे. आता संगमनेर वगळता सर्व तालुक्यांमध्ये विखे पॅटर्न सक्सेस ठरलेला आहे. त्यामुळे आता कोल्हे यांनी विखेंशी धरलेले वैर हे राजकीय आत्महत्या ठरणार नाही ना..? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. विखे आणि थोरात यांच्यात विळा कणीसाचे नाते आहे. त्यातच आता गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक त्यात थोरातांनी केलेली घुसखोरी ही नक्कीच विखेंचा स्वाभिमान दुखावणारा ठरणार आहे. गणेश सहकारी साखर कारखान्यात जिल्ह्यातील सर्व नेते एक झाले तरी विखेंच्या समोर त्यांचा टिकाव लागेल असे गृहीत धरणं हे देखील अतिशयोक्ती ठरणार आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी फक्त महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नाममात्र शह देण्यासाठी किंवा राजकीय सुड उगविण्यासाठी या निवडणुकीत भाग घेतला आहे. हा भाग कार्यकर्त्यांच्या किती पचनी पडेल हे बघणं ही उत्सुकतेचे ठरणार आहे. 


       महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणूकीची सर्व गणिते आधीच सोडवलेली दिसत आहे. गणेश कारखाना हा त्यांचा उद्देश नसुन गद्दार ओळखण्यासाठी त्यांनी  या निवडणुकीत लक्ष घातले आहे. असेच प्रथमदर्शनी दिसून येते आहे. यामध्ये थोरातांचा इंटरेस्ट फक्त विखेंच्या वाढत्या लोकप्रियतेला खीळ घालण्यासाठी आहे. राजकीय सुडात आमदार थोरात स्वतःची पोळी भाजून घेत आहे, ही त्यांची राजकीय खेळी आहे. तर यात कोल्हे यांचा पुन्हा एकदा बुद्धिबळातील प्यादा होण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. त्यामुळे  यात कारखाना कुणाच्या ताब्यात जाईल हे माहीत नाही पण येणार्या विधानसभा निवडणुकीत कोल्हें हे विखे पॅटर्न चे बळी ठरणार हे सुनिश्चित समजावे. 


         माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे तत्कालीन वर्चस्व हे वेगळे होते. त्यांना सहकाराची नाळ माहिती होती. त्यामुळे तेंव्हाचे राजकीय गणिते वेगळी होती. सध्या तरी स्थानिक राजकीय गणितं वेगळी दिसतील मात्र भविष्यात राज्य पातळीवर ही सर्व समीकरण बदलणार आहे, हे कोल्हे यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होते. परंतु सध्या तरी ही वेळ कोल्हे यांची निघून गेलेली असून गणेश सहकारी साखर कारखान्याची महत्वकांक्षा त्यांच्यासाठी राजकीय सुसाईड ठरणार असे सध्या तरी भासत आहे. कोपरगाव विधानसभेची जागा पुन्हा आपल्या हातात आणण्यासाठी कोल्हे यांना विखे पिता पुत्राचीच गरज होती. परंतु थोरातांशी सलगी हे कोल्हेंचे अज्ञान आहे की, थोरातांच्या स्मितहास्याला किंवा पवारांच्या जुन्या स्नेहाला बळी पडलेत हे येणारा काळच पुढे काही दिवसांत ठरवेल. 


        असो सध्या तरी गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे थोरातांच्या राजकीय खेळीत अडकलेला असून, यात विजय कुणाचाही होवो, पण भविष्यात मात्र याचे सर्व परिणाम हे कोल्हेंना भोगावे लागणार यात तिळमात्र शंका नाही. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा सर्व पक्ष विरोधी एकटे सुजय विखे अशी लढत झाली होती. दस्तुरखुद्द राजकारणातील भीष्म समजले जाणारे शरद पवार यांनी आपली वेगळी यंत्रणा उभी केली होती. सुजय विखे विरुद्ध पवार, थोरात, गडाख, जगताप, लंके, कळमकर, नागवडे, तनपुरे, मुरकटे काही अंशी कर्डीले सुद्धा जावई प्रेमापोटी विखे विरोधात उभे होते..‌‌‌तरीही या मातब्बर नेत्यांची डाळ एकट्या सुजय विखेंनी शिजवून दिली नव्हती. व या लोकसभेत त्यांनी प्रथमच ऐतिहासिक विजय मिळवला होता. याचं कौतुक स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आजची गणेश कारखान्याची परिस्थिती ही तशीच आहे.  विखे विरुद्ध थोरात+पवार+कोल्हे. यामध्ये विखे पिता पुत्र कशी रणनिती आखतात याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. 


https://youtu.be/14qd-93At40
https://youtu.be/14qd-93At40

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 

संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052



       

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच