संगमनेर येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक दिन समारंभ संगमनेर येथे साजरा संगमनेर प्रतिनिधी: आज दिनांक १५/०३/२०२३ रोजी श्रीमती जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर, किशोर कदम सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांचे प्रमुख उपस्थितीत व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर राक्षे यांचे अध्यक्षतेखाली संगमनेर तहसिल कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अमोल निकम, तहसीलदार संगमनेर, शीतल घावटे, परिविक्षाधीन तहसीलदार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुरेश राहणे, दिनेश थोरात, संगमनेर तालुका अध्यक्ष विनायक वाडेकर, सर्जेराव वाघ, सचिन गिरी, सौरभ म्हाळस ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका सचिव, कारभारी देव्हारे, कायदेशीर सल्लागार गोडसे सर, तसेच वजनमापे निरीक्षक फटांगरे, व संगमनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि मोठ्या संख्येने ग्राहक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व मान्यवरांचा सत्कार करून करण्...