शिवसेना गमावल्यावरही उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या

उद्धव ठाकरे का व कुणामुळे आलेत अडचणीत सविस्तर विश्लेषण 


शिवसेना पक्ष आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला द्यायचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. 

मुंबई, 20 फेब्रुवारी : शिवसेना पक्ष आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला द्यायचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. एवढच नाही तर त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेतून ठाकरे चांगलेच संतापलेले बघायला मिळाले.

'घरफोडी केलेली आहे, दरोडा घातला आहे. जेवढं काही आपल्या खोक्यात घालता येईल तेवढं घातलं आहे. पोलीस चोराला सांगत आहेत, यांची दोन-तृतियांश मालमत्ता तुझ्याकडे आहे, त्यामुळे उरलेली मालमत्ताही तुझीच आहे. याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिला आहे, हा निकाल अत्यंत अयोग्य आहे. कारण जो घटनाक्रम घडला आहे, त्याप्रमाणे निकाल अपेक्षित आहे', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

'आपल्या लोकशाहीचं दुर्दैव असं आहे की पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे. पक्षांतर्गत निवडणुका पाहिजेत, देशात निवडणुका पाहिजेत. सगळ्या गोष्टी जर निवडणुकीने होत असतील आणि निवडणूक आयुक्त नेमणुकीने होत असेल तर लोकशाहीचा गाभा धोक्यात येतो. आताचा निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत, ही माझी मागणी आहे', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाचे आरोप

78 पानांच्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. 2013 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आणि 2018 साली शिवसेनेच्या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली, पण या दुरुस्तीच्या नोंदी निवडणूक आयोगाकडे नाहीत. निवडणूक आयोगाला याबाबत कळवण्यात आलं नाही, असा दावा आयोगाने निकालात केला आहे.

घटना दुरुस्तीनंतर उद्धव ठाकरेंनी स्वत:कडे अमर्याद अधिकार घेतले आणि त्यांनी प्रतिनिधी सभेत निवडणुकांऐवजी नेमणुका केल्या. शिवसेनेच्या घटनेत प्रतिनिधी सभा पक्षप्रमुखाची निवड करते, पण उद्धव ठाकरेंनी प्रतिनिधी सभेमध्ये नियुक्त्या केल्या, हे लोकशाहीला धरून नसल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com

संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052


Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच