शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे सेंट जॉन,खडकी शाळेत 'स्कूल चले हम' व 'शाळा तेथे वाचनालय' अभियान

शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे सेंट जॉन,खडकी शाळेत 'स्कूल चले हम' व 'शाळा तेथे वाचनालय' अभियान पुणे प्रतिनिधी : आज 'स्कूल चले हम' या अभियान अंतर्गत सेंट जॉन शाळेतील सर्व विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप वाटप करण्यात आले. तसेच शाळा तेथे वाचनालय या अभियान अंतर्गत छ.शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, महात्मा गांधीजी तसेच क्रांतिकारी व समाजसुधारक, प्रेरणादायी पुस्तकांचा संच यावेळी देण्यात आला. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील झोपडपट्टी, डोंगराळ, दुर्गम भागात संस्थेतर्फ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळाराम माडकर हजर होते. त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. पुणे जिल्हाध्यक्ष श्री.अमित शिंदे यांनी संस्थेची माहिती दिली. 'स्कूल चले हम' अभियान 26 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. मागील 20 दिवसात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्य़ात गरजू व गरीब 500 विद्यार्थीना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच 21 शाळेत 'शाळा तेथे वाचनालय' हा ...