गांजा
संगमनेर पुन्हा हादरलं सुकेवाडीत 456 किलो गांजा जप्त; गांजा तस्कर तुषार पडवळ उर्फ 'दमल्या' फरार! राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर संगमनेरात अंमली पदार्थांवर मोठी धडक; रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता संगमनेर शहर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या वाढत्या कारवायांमुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची 'पत्रकबाजी' सुरू असतानाच, नाशिक विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत सुकेवाडी परिसरात तब्बल 456 किलो गांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे केवळ संगमनेरमध्येच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेवाडी येथील आरोपी तुषार उत्तम पडवळ उर्फ 'दमल्या' याच्या घरावर ही कारवाई करण्यात आली. आज (गुरुवारी) सकाळी टास्क फोर्ससह संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर. कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक सावंत आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने पडवळ याच्या घरावर छापा टाकला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोप...