बिऱ्हाड मोर्चा म्हणजे फक्त स्टंटबाजी: सुहास ब्राम्हणे
बांधावर जावून धान्य का वाटले नाही..ॽ फक्त चर्चेत राहण्यासाठी उठाठेव- सुहास ब्राम्हणे
राहाता दि.१२ प्रतिनिधी- शेतकऱ्यांच्या बांधावर जावू न शकलेल्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी काढलेला बिऱ्हाड मोर्चा म्हणजे फक्त स्टंटबाजी होती. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना जे काही देवू शकले नाहीत त्यांना युती सरकरच्या आनंदायी शिध्यावर बोलण्याचा नैतिकही अधिकार नाही. शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर बांधावर जावून धान्य का वाटले नाहीॽ असा सवाल भाजयुमोच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे सरचिटणीस सुहास ब्राम्हणे यांनी केला.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुहास ब्राम्हणे यांनी म्हणले आहे की, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नूकसान झालेल्या शेती पीकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यापूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने मदतही जाहीर केली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा मिळाला आहे. नंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचे आश्वासित करण्यात आले असून, सरकारने निकष बदलून सर्व मदत शेतकऱ्यांना दिली असताना सुध्दा मोर्चाच्या माध्यमातून पंचनामे करण्याची आणि मदतीची केलेली मागणी म्हणजे एक थट्टा होती. याकडे लक्ष वेधून ब्राम्हणे म्हणाले की, या दिवाळी संकटात राज्य सरकारने आनंदाचा शिधा देवून गरीबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी संकटातही उभे राहता आले नाही ते आज सरकारच्या आनंददायी शिध्यावर टिका करुन एकप्रकारे गरीबांची चेष्टा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आनंदाच्या शिध्यावर बोलण्याचा नैतिकही अधिकार नसल्याचे सांगून ज्यांचे देण्याचे दायित्व नाही त्यांनी आपणच सामान्याचे कैवारी असल्याचा खोटा दिखावा केला असल्याची टीका ब्राम्हणे यांनी केली.
अतिवृष्टीत नूकसान झालेल्या शेती पीकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मदत जाहीर करुन दिलासा दिला आहे. लंपीसारख्या संकटात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खंबीरपणे उभे राहीले आहेत.ही वस्तुस्थिती असताना सुध्दा केवळ आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आणि मागण्यांचा अभ्यास न करता केलेली स्टंटबाजी म्हणजे स्वता:चे हसू करून घेतल्याचे त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी RAJSATTA NEWS वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज RAJSATTA NEWS PORTAL.
संपादक: सहदेव जाधव मो. ९५४५५२९०५२
Comments
Post a Comment