राजेंद्रजी गोंदकर यांचे मार्गदर्शनाखाली'धन्यवाद मोदीजी अभियान'अत्यंत कार्यक्षमतेने

 भाजप उत्तर नगर जिल्हा 'धन्यवाद मोदीजी' अभियान राबविण्यात राज्यात वरच्या क्रमांकावर



उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्रजी गोंदकर यांचे मार्गदर्शनाखाली'धन्यवाद मोदीजी अभियान'अत्यंत कार्यक्षमतेने राबवून महाराष्ट्र राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. याबद्दल या अभियानाचे जिल्हा संयोजक श्री.राजेंद्र सांगळे, सह संयोजक अनिल भनगडे व अंकुश काळे यांचे सह भाजयुमो जिल्हा अध्यक्ष श्रीराज डेरे,तसेच नगर(उत्तर)जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात धन्यवाद मोदीजी अभियान जोरदारपणे राबविण्यात आले. उत्तर नगर जिल्हा भाजप कार्यकर्त्यांनी सुमारे 17125 पोस्टकार्ड लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्राप्त केले. मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी या अभियानाचे जिल्हा संयोजक श्री.राजेंद्र सांगळे व सहसंयोजक अनिल भनगडे यांच्यासह आनंद बुधेकर व राजेश शर्मा यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात जाऊन सतरा हजार पेक्षा अधिक धन्यवाद मोदीजी अभियानाची पोस्टकार्ड DCM साहेब श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत,प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब,या अभियानाच्या प्रदेश संयोजिका सौ.श्वेता शालिनी,सह संयोजक हर्षल विभांडीक यांचेकडे जमा केले. 


मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष मा.बावनकुळे साहेब यांनी,उत्तर नगर जिल्हा भाजपने केलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.

उत्तर नगर जिल्हा भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमा बद्दल व मिळविलेल्या यशाबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे,मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे,मा.आमदार वैभवराव पिचड यांनी या अभियानात मेहनत घेणाऱ्या संयोजकांचे,कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे,अशी माहिती जिल्हा भाजपतर्फे प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी यांनी दिली.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी RAJSATTA NEWS वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज RAJSATTA NEWS PORTAL. 

संपादक: सहदेव जाधव मो. ९५४५५२९०५२

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच