डॉ.भानुदास जी.डेरे शैक्षणिक संस्थेत विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरा

डॉ.भानुदास जी.डेरे इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेजचा परितोषिक वितरण सोहळा संपन्न..



संगमनेर प्रतिनिधी : दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी डॉ.भानुदास जी. डेरे इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेजचा सहशालेय व क्रिडा महोत्सव चा बक्षीस वितरण कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालकांना आमंत्रित केले होते. यावेळी संजय उपाध्ये , खंडागळे विजय , गोपाळे रवींद्र , हासे रतन , दिघे कमल , व भवर अश्विनी हे उपस्थित होते. कार्यकमाची सुरवात सरस्वती पूजनाने झाली, पाहुण्याचा सत्कार मुख्यकार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. शाळे मध्ये चार संघा मध्ये स्पर्धा घेण्यात आल्या त्या मध्ये विजेता संघ म्हणून मार्स हाउस याला करंडक देऊन गौरवण्यात आले .प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री उपाध्ये संजय यांनी जिद्द व चिकाटीचे महत्व पटवून देताना यश कसे मिळवायचे याचा कानमंत्र दिला .  खंडागळे विजय यांनी एकाग्रता ,कष्ट ,व निष्टा या गुणांना शालेय जीवनात किती म्हत्वाचे स्थान आहे हे अधोरेखित केले .या प्रसंगी सौ आशालता शेट्टी ,मुख्याध्यापिका सौ.पवार रेखा यांनी मनोगत व्यक्त केले .सुत्रसंचलन.संगीता घुले , उपासनी तृप्ती ,वनिता जोंधळे , आहेर दीपिका व जाधव राहुल यांनी केले .



 बक्षीस पात्र सर्व विध्यार्थ्याचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.भानुदास जी.डेरे उपाध्यक्ष अॅड श्रीराज भानुदास डेरे ,संचालिका सौ अंकिता श्रीराज डेरे ,मुख्यकार्यकारी अधिकारी सौ आशालता शेट्टी, मुख्याध्यापिका पवार रेखा व तसेच शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी विध्यार्थ्याचे कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या..





 

Comments

Popular posts from this blog

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच

खळबळजनक: धर्मांतरण करुन महिलेवर सामुदायिक बलात्कार...गुन्हा दाखल

काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार: राष्ट्रवादी नाराज