जाचकवाडीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न

डॉ बिपिन महाले यांचे स्मरणार्थ भव्य आरोग्य तपासणी शिबिर.

(प्रतिनिधी: सतिश फापाळे)

     अकोले तालुक्यातील जाचकवाडी गावात स्वर्गीय डॉ बिपिन महाले यांचे स्मरणार्थ गुरुवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

      जाचकवाडी गावातील डॉ बिपिन महाले यांचे समाजाप्रती विलक्षण आस्था होती.गोर गरीबांची सेवा करत त्यांनी समाजसेवा केली होती.डॉ बिपिन यांचे स्मरणार्थ आयोजित शिबिरात ब्लड प्रेशर,ब्लड शुगर लेव्हल तपासणी, ई.सी.जी,हृदय तपासणी, पल्स रेट तपासणी, ऑक्सिजन लेव्हल,वजन,उंची तपासणी करून उपचार देखील करण्यात येणार आहे.


     हे शिबिर जाचकवाडी, बेलापूर ग्रामस्थ,श्रीराम हॉस्पिटल बेलापुर व मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले असून या शिबिरासाठी डॉ. सुशांत गीते, डॉ.अंतोष हांडे,डॉ सागर फापाळे सारखे नामवंत डॉक्टर या शिबिरात सेवा देणार आहे.


Comments

Popular posts from this blog

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच

खळबळजनक: धर्मांतरण करुन महिलेवर सामुदायिक बलात्कार...गुन्हा दाखल

काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार: राष्ट्रवादी नाराज