जांभूळवाडी ग्रा.पं. निवडणूक: बुवाजी खेमनर व महादू कुदनर यांच्या नेत्रुत्वाची सरळ लढत


जांभूळवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकीत चुरस वाढली 

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांभूळवाडी  ग्रा.पं. ची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे नेते बुवाजी पाटील खेमनर व काँग्रेसचे महादू पाटील कुदनर यांच्या नेतृत्वात दोन्ही पॅनल उभे आहेत. जांभूळवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत एकूण 20 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहे. ही निवडणूक नात्या गोत्यात अडकल्याने नेमका कोण बाजी मारेल याचा अंदाज सहज लागणार नाही. 

        एक जागेचा विषय वगळता जवळ जवळ एकास एक उमेदवार असल्याने मोठी काट्याची टक्कर बघायला मिळणार आहे. मागील निवडणुकीत बुवाजी खेमनर व महादू कुदनर यांच्यात सरळ लढत झाली होती. या लढतीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्या निवडणुकीत बुवाजी खेमनर यांनी एकाकी लढत दिली होती. आपले सर्व सहकारी महादू पाटील कुदनर यांच्या सोबत गेल्याने बुवाजी पाटील खेमनर एकाकी पडले होते. आणि त्यांचा त्या निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. परंतु या निवडणुकीत मात्र सरपंच पद हे महिला आरक्षित असल्याने या निवडणुकीत या दोन्हीही मातब्बरांना नेत्रुत्व करणे हाच पर्याय योग्य वाटला. 

         यावेळी माजी सरपंच महादू कुदनर यांनी पुर्ण पाच वर्षे ग्रामपंचायत चा कारभार बघताना अनेक विकासकामे केली. चिचपटा येथिल मराठी शाळेची आकर्षक दोन मजली इमारत बनवली. त्याचबरोबर ग्रामपंचायत इमारत देखिल बांधण्यात आली आहे. पानंद रस्त्यांची कामे करत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गणेशनगर ते चिचपटा रस्ता जनतेसाठी खुला केला. त्याच बरोबर डोंगरे वस्तीवर पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. अशी विकास कामाची मालिका शेतकरी विकास मंडळाकडून सांगितली जाते. या विकास कामांवर मात्र परिवर्तन मंडळाने मोठी टिका केली आहे. 



आरोप प्रत्यारोपांच्या फैली झडत असून या निवडणूकीत मोठी चुरस बघायला मिळणार आहे. आज सायंकाळी शेतकरी विकास मंडळाचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे.  तर आजच सायंकाळी 4 वाजता प्रचार सभा देखिल होणार असल्याची माहिती शेतकरी विकास मंडळाने दिली आहे.  आजची ही प्रचार सभा मोठ्या प्रमाणावर गाजणार आहे. त्यामुळे या सभेत कोण काय बोलतय याकडे विरोधकांसह अवघ्या  साकूरकरांचे लक्ष लागलेले आहे. 


                                                बातम्या व जाहिरातीसाठी 


संपादक: सहदेव जाधव 

9545529052

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच