संगमनेर तालुक्यातील अवैध दारु गांजा ला राज्य उत्पादन शुल्क चा आशिर्वाद

 संगमनेर तालुक्यात अवैध दारु गांजा विक्रेत्यांची मुजोरी वाढली..


संपादकीय: सहदेव जाधव 

       राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे काम नक्की काय आहे हे संगमनेर येथील कार्यालयातील अधिकार्यांना शिकवणं गरजेचे झाले आहे. कारण अनधिकृत ढाब्यांवर दिवसा ढवळ्या चाललेला मद्याचा महापूर या अधिकार्यांना दिसत नाही. संगमनेर च्या प्रमुख चारही मुख्य रस्त्यावर हा खुलेआम कारभार चालू आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष जात नाही हा विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
          संगमनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारु गांजा हातभट्टी ला ऊत आला आहे. परंतु याकडे गांधारीची पट्टी डोळ्याला बांधून बसलेल्या राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकार्यांना दिसत नाही. वेळोवेळी सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व गावातील त्रस्त झालेले नागरिक काॅल करून माहिती देत असतात. परंतु समोरुन कुठलीही समाधानकारक उत्तर मिळत नाही. 'येतो उद्या, आज राजूर साइटला आहे, आज गाडी नाही, माझी सुट्टी आहे.' असे उडवा उडवी केल्याचे आढळून येत आहे. 


        संगमनेर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील ढाब्यांवर खुलेआम अवैध दारूची विक्री दिमाखात सुरु आहे. यामध्ये पुणे नाशिक हायवे, संगमनेर कोतूळ रोड, संगमनेर अकोले रोड, संगमनेर लोणी रोड, संगमनेर कोपरगाव रोड या रस्त्यावर खुलेआम ढाब्यांवर दारुसह काही टपरी चालकांकडे गांजाची देखील विक्री केली जात असल्याचे नागरिक बोलत आहे. मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये देखील अवैध दारु जोसात सुरू आहे...ना कुठले भय, ना कुठली फिक्र या अवसानात अवैध धंद्यावाले वागत आहे.
           संगमनेर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करुन ही अवैध दारु व गांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे. अवैध दारु विक्रेते खुलेआम नागरीकांत दहशत पसरवीत असून शेजारी राहणाऱ्याना हकनाक त्रास देताना दिसत आहे. अशा घटना आढळून येत आहे. ढाब्यांवर मिळणारी दारु ही ड्युब्लीकेट असल्याचे देखील प्रकार समोर आले आहे. परंतु गाढ निद्रेत असलेलं हे प्रशासन आता तरी जागे होईल का..? 


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 

संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच