संगमनेर करहो सावधान..! संगमनेर मध्ये आली आहे लेडी डॉन... आधी हाय... मंग काय.... नंतर बाय... पण असे बाय नाही लाखो रुपयांना चुना लावून बाय...

पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या या युट्युबर व तोतया पत्रकारावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

सुरुवात कशी होते बघा..हाय काय झाल्यावर सर चला ना चहा घेऊ.. मंग एका हॉटेल मध्ये चहा प्यायला न्यायचे.. नंतर गुपचूप फोटो काढून घ्यायचा... असे एकदा नव्हे तर किमान दोन तीन वेळेस करायचं... भाऊ आहात दादा आहात असे नात्यात गुरफाटायचे आणि नंतर रात्री अपरात्री फोन करायचा अडचणीत आहे आई आजारी आहे.. बाबा आजारी आहे... खूप टेंशन मध्ये आहे.. दहा हजाराची गरज आहे... आत्महत्या करावी वाटते... आशा गप्पा मारायचा... नंतर मी तुझ्या बायकोला हे असे फोटो दाखवेल.. तूझा माझा रात्री दीड दोनला फोन झाला..कश्यासाठी एवढ्या रात्रीला फोन केला.. आपले प्रेम आहे म्हणून ना... अशी सुरुवात होत असते... त्यामुळे दर्शकहो सावधान.. या महिलेने अद्याप पर्यंत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, शासकीय अधिकारी, पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित लोकांना गंडा घातला आहे. 

पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या युट्युबर व तोतया पत्रकारावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुण तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणाकडे पाच लाख रुपयाची खंडणी मागितली. या कारणास्तव संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघां जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा अजितकुमार सारडा रा. अशोक चौक, गोविंद नागरे रा. नेहरू चौक, ओंकार राऊत रा. घुलेवाडी अशा तिघां जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 356(2), 308(2), 308(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कृष्णा सारडा हिचे संगमनेर शहरात अनेक कारनामे समोर येतं आहेत. आज नाशिक विभागाचे पोलीस आयुक्त यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन सदर महिले बाबत माहिती घेतली. पोलीस ठाण्यात या महिलेपासून पीडित असलेले पुरुषांनी धाव घेतली. त्याच बरोबर अनेक सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर महिलेला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. यावेळी महिलानी या महिलेला चांगलाच धडा शिकवला आहे. 

मागील काही महिण्यापासून पत्रकार म्हणून मिरणाऱ्या या महिलेने अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. व्यापारी, व्यावसायिक यांना सारडा यांनी मैत्री पूर्ण संबंध प्रस्तापित करून नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहे. अशा अनेकांना या महिलेने गंडा घातला आहे. 

एका हाय प्रोफाइल नामांकित सलून चालकाला देखील या सारडाने चिट करून खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. याच वेळी या महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब यांना देखील या महिलेच्या कुटील डावाला सामोरे जावे लागले होते. असो या महिलेला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी व पत्रकारितेला बदनाम करणाऱ्या या प्रवृत्ती ला ठेचून काढव अशी मागणी आता संगमनेर कर करत आहोत. 

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच