शिव प्रभात ट्रस्ट चा भ्रष्टाचार उघड

सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांचे बहुचार्चित उपोषण काही दिवसांसाठी स्थगित...

संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांच्या माहिती नुसार उद्या ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

उपोषणाला बसू नये म्हणून दबाव टाकण्याचाही होतोय प्रयत्न..

साकूर वार्ताहर - संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर ११ या सरकारी जागेत शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट ने अनधिकृत अतिक्रमण करून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत शासनाच्या निधीचा गैरवापर केला आहे. त्यामुळे या ट्रस्टने शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत सरकारी जागेत अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई करून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित स्थानिक प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा ३ एप्रिल २०२५ रोजी संगमनेर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता सुनिल इघे यांनी दिला होता. 

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदारांनी थेट शिवप्रभात ट्रस्टच्या चौकशीचे आदेश काढले आहेत. तसेच शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात चौकशी होणार आहे. त्यामुळे तहसीलदार धिरज मांजरे यांनी चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल, तसेच यासाठी एक महिन्याचा कालावधी वेळ द्या अशी विनंती केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी त्यांचे बहुचर्चित आमरण उपोषण तात्पुरत स्थगित केले आहे. मात्र आमरण उपोषण जरी तात्पुरत स्थगित केले असले तरी त्यानंतर वेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी लगत गट नंबर ११ हा सरकारी नावे आहे. तसेच या गटात जवळपास १७.६२ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी काही क्षेत्रात महावितरण व ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेची टाकीची अधिकृत नोंद केलेली आहे. मात्र शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट ने या सरकारी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत ताबा घेतला आहे. तसेच शासनाला फसवून या जागेवर कोट्यावधींचा निधी लाटून या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. तसेच सदर क्षेत्रातील उताऱ्यावर देखील याबाबत कुठलीही नोंद आढळून येत नाही. सदर जागेचा उतारा बघता उताऱ्यावर महावितरण कंपनीला व नळ पाणी पुरवठा योजनेला अधिकृत जागा दिल्याची नोंद आहे. मात्र सदर शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट ची अशी कुठलीही नोंद आढळून येत नाही. उलट शासनाची फसवणूक करत कोट्यावधींचा निधी मिळविला आहे. 

सध्या गोरगरीब जनतेला राहण्यासाठी निवारा नाही. छोट्या छोट्या व्यवसायिकांना आपण अतिक्रमण केले म्हणून त्या व्यवसायिकावार बुलडोझर चालवतो. मात्र मांडवे बुद्रुक येथे तर एखादा गुंठा नव्हे तर तब्बल मोठ्या प्रमाणात संबंधित ट्रस्टने अतिक्रमण केले असून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या ट्रस्टने शासनाचा निधी खोटे कागदपत्र बनवून लाटला आहे. तसेच मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीत देखील त्यावेळी चुकीची नोंद झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय नेत्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या शासकीय क्षेत्रावर अनधिकृत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे यामागे कोणाचा हात आहे हे देखील समोर येणं गरजेचं आहे. तसेच ज्या ज्या शासकीय कार्यालयातून खोटी कागदपत्रे दिली त्यांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच ज्या ट्रस्टने फसवणूक करत अतिक्रमण करून शासनाचा कोट्यावधींचा निधी लाटला त्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच