Posts

गणेश कारखाना निवडणूक: थोरातांची महत्वकांक्षा पण कोल्हेंची राजकीय सुसाईड

Image
गणेश कारखाना निवडणुक: विखे - थोरात वादात कोल्हेंचे राजकारण संपुष्टात..? संपादकीय: सहदेव जाधव  राहाता : गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असून गेली कित्येक दिवसांपासून कोल्हेंचे वर्चस्व असलेला हा कारखाना मागील काही वर्षांपासून विखे पाटील यांनी चालवायला घेतला आहे. आता या कारखान्यावर थोरातांचा डोळा असून त्यांनी कोल्हेंच्या माध्यमातून विखेंना शह देण्याचे ठरविले आहे. यात आता थोरातांनी प्रथमच थेट सीमोल्लंघन करण्याचे धाडस दाखवले आहे. यात थोरातांचा राजकीय सुड उगविण्याचा नाममात्र इच्छाकांक्षा असून खरे नुकसान मात्र कोल्हेंचेच होणार आहे.            काही काळापुर्वी गणेश वर शंकरराव कोल्हे यांचे वर्चस्व होते. मात्र आजची परिस्थिती ही वेगळी आहे. आता संगमनेर वगळता सर्व तालुक्यांमध्ये विखे पॅटर्न सक्सेस ठरलेला आहे. त्यामुळे आता कोल्हे यांनी विखेंशी धरलेले वैर हे राजकीय आत्महत्या ठरणार नाही ना..? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. विखे आणि थोरात यांच्यात विळा कणीसाचे नाते आहे. त्यातच आता गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक त्यात थोरातांनी केलेली घुसखोरी ही नक्कीच...

हैवानालाही लाजवेल असे कृत्य प्रियशीला मिक्सरमध्ये दळले

Image
कटरने केले प्रियेसीच्या धडाचे तुकडे..नंतर मिक्सरमध्ये बारीक केले हैवानाचा चेहरा/पिडीत महिला  मुंबई ब्युरो रिपोर्ट         मुंबईत क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडणारी हत्येची एक भयंकर घटना उजेडात आली आहे. या प्रकरणात आरोपीने आपल्या लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापणाऱ्या इलेक्ट्रीक करवतीने तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बुधवार दिनांक 7 जून रोजी सायंकाळी पोलिसांचे एक पथक अचानक मीरा रोडवरील गीता आकाश दीप सोसायटीत पोहोचले. तिथे ते दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळालेल्या फ्लॅटवर पोहोचले. 7 व्या मजल्यावरील या फ्लॅटमध्ये पोहोचताच पोलिसांना धक्काच बसला. कारण दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणाबाबत त्यांनी मीडियामध्ये जे काही वाचले व ऐकले होते, ते तिथे त्यांना प्रत्यक्ष पहावसाय मिळाले. रक्ताने माखलेले 3 कटर जप्त पोलिसांना फ्लॅटमधून एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. सरस्वती वैद्य असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांना घटनास्थळी झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारे 3 कटर आढळले. हे तिन्ही कटर रक्ताने...

जिल्ह्यातील काही लोकांनी विकासकामांना अडथळे निर्माण केले:विखे पाटील

Image
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निझर्णेश्वर येथे कार्यकर्ता शिबीर  संगमनेर दि. ८ प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशिर्वाद, जनता आणि कार्यकर्त्‍यांच्‍या भक्‍कम पाठबळामुळेच राज्‍यात मोठ्या पदावर काम करण्‍याची संधी मिळालेल्‍या संधीतून जनतेच्‍या हिताचे निर्णय आपण करीत आहोत. परंतू आपल्‍या निर्णयाशी आणि परिसराच्‍या विकासाची असुया काहींना वाटत आहे त्‍यामुळेच चांगल्‍या कामात अडथळे निर्माण करण्‍याचे काम सुरु झाले आहे. यापुर्वी सुध्‍दा बाहेरुन आलेली आव्‍हानं परतवून लावण्‍याचे काम कार्यकर्त्‍यांनी संघटीतपणे केले आहे. संघटनेची ताकद हेच आपल्‍या यशाचे बलस्‍थान असल्‍याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.        श्री.क्षेत्र निझर्णेश्‍वर येथे जनसेवा मंडळाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यात मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला. नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या प्रवरा सहकारी बॅक, राहाता कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या नवनिर्वाचीत पदाधिकारी आणि संचालकांचा सत्‍कार याप्रसंगी...

आ.बाळासाहेब थोरात गटाच्या विजयाने तालुक्यात उत्साहाचे वातावरण

Image
शिबलापूर

चंदनापूरी येथे श्री साई मुर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण,साईधाम पदयात्री निवास लोकार्पण सोहळा

Image
चंदनापुरीत लोकवर्गणीतून साकारले 1 कोटी 10 लाख रूपायाचे साई मंदिर.. !   19 ते 25 तारखेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन संगमनेर प्रतिनिधी: सहदेव जाधव  संगमनेर तालुक्यातील चंदनापुरीच्या नगरी मध्ये दिडशे वर्षांपूर्वी साई बाबा काही दिवस वास्तव्यास होते अशी माहिती जुने जानकर लोक सांगतात. त्यानुसार लोकसहभागातून येथे भव्य- दिव्य असे 1 कोटी 10 लाख रूपये खर्च करून साई मंदिर उभारण्यात आले आहे. शुक्रवार दि. 19 ते गुरुवार ता. २५ मे रोजी श्री साई मुर्ती प्राणप्रतिष्ठा,कलशारोहण,साईधाम पदयात्री निवास लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला चंदनापुरी हे गाव वसलेले आहे.दिडशे वर्षांपूर्वी साईबाबा या गावात काही दिवस वास्तव्यास होते असे गावातील जुने जानकर लोक सांगत आहे.त्यामुळे गावामध्ये साई बाबांचे मंदिर व्हावे अशी मागणी नागरिकांची होती त्यानुसार ग्रामस्थांनी २०१७ मध्ये लोकसहभागातून साई मंदिर बांधण्यास सुरूवात केली आणि २०२३ मध्ये आज भव्य दिव्य असे साई मंदिर साकारले आहे. यामध्ये सर्व दिंड्या व पायी पदयात्री ,स्वच्छतागृह,स्वयंपाक गृह सह निवासाची सह सुविध...

शेवगाव दंगलीतील मास्टर माईंड शोधून काढणार:ना.विखे पाटील

Image
शेवगाव येथील दंगल प्रकरणी विखे पाटील अलर्ट मोडवर...शहराची पाहणी   शेवगाव प्रतिनिधी: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत राडा झाला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. त्यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच तीन पोलिस व गृहरक्षक दलाचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले, तरी शहरात तणावपूर्ण शांतता होती. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी ११२ जणांवर गुन्हे दाखल केले असून, २९ जणांना अटक केली आहे.        दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १५) तालुक्यात ठिकठिकाणी कडकडीत ‘बंद' पाळण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहरात फिरुन आढावा घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यावेळी उपस्थित होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, अजित पाटील हे शेवगाव शहरात तळ ठोकून होते. याप्रकरणी पोलिस कर्मचारी महेश सावंत यांनी फिर्याद दिली.    ...

संगमनेर तालुक्यातील अवैध दारु गांजा ला राज्य उत्पादन शुल्क चा आशिर्वाद

Image
  संगमनेर तालुक्यात अवैध दारु गांजा विक्रेत्यांची मुजोरी वाढली.. संपादकीय: सहदेव जाधव         राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे काम नक्की काय आहे हे संगमनेर येथील कार्यालयातील अधिकार्यांना शिकवणं गरजेचे झाले आहे. कारण अनधिकृत ढाब्यांवर दिवसा ढवळ्या चाललेला मद्याचा महापूर या अधिकार्यांना दिसत नाही. संगमनेर च्या प्रमुख चारही मुख्य रस्त्यावर हा खुलेआम कारभार चालू आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष जात नाही हा विचार करायला लावणारी गोष्ट आहे.           संगमनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारु गांजा हातभट्टी ला ऊत आला आहे. परंतु याकडे गांधारीची पट्टी डोळ्याला बांधून बसलेल्या राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकार्यांना दिसत नाही. वेळोवेळी सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व गावातील त्रस्त झालेले नागरिक काॅल करून माहिती देत असतात. परंतु समोरुन कुठलीही समाधानकारक उत्तर मिळत नाही. 'येतो उद्या, आज राजूर साइटला आहे, आज गाडी नाही, माझी सुट्टी आहे.' असे उडवा उडवी केल्याचे आढळून येत आहे.          संगमनेर तालुक्यातील ...