Posts

शिव प्रभात ट्रस्ट चा भ्रष्टाचार उघड

सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांचे बहुचार्चित उपोषण काही दिवसांसाठी स्थगित... संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांच्या माहिती नुसार उद्या ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस उपोषणाला बसू नये म्हणून दबाव टाकण्याचाही होतोय प्रयत्न.. साकूर वार्ताहर - संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर ११ या सरकारी जागेत शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट ने अनधिकृत अतिक्रमण करून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत शासनाच्या निधीचा गैरवापर केला आहे. त्यामुळे या ट्रस्टने शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत सरकारी जागेत अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई करून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित स्थानिक प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा ३ एप्रिल २०२५ रोजी संगमनेर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता सुनिल इघे यांनी दिला होता.  दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदारांनी थेट शिवप्रभात ट्रस्टच्या चौकशीचे आदेश काढले आहेत. तसेच शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात चौकशी होणार आहे. त्यामुळे तहसी...

वारी विधानभवनाची, लोकशाही च्या मंदिराची

प्रस्ताविक : वाचकहो नमस्कार मी सहदेव ताराबाई भिकाजी जाधव .. माझा एक अनोखा आणि माझ्या जीवनातील विशेष महत्वाचा अनुभव आपल्यासमोर घेऊन आलो आहे. "वारी विधानभवनाची, तथा मी सेवक लोकशाहीचा " खरे तर हा अनुभव खुंप  रोमांचक  आहे. तेवढाच महत्वाचा आहे. मी प्रथमच पत्रकार म्हणून विधानभवनात आलो आणि या अधिवेशनाचे कामकाज  मी अतिशय अभ्यासपूर्ण हाताळले . विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या  अगोदरच शेवटचे अधिवेशन असल्याने हे अधिवेशन वादळी झाले यात काही शंका नाही. नगर जिल्ह्यातून मी एकटाच पत्रकार मी तेथे दिसलो.  प्रथमच मला पत्रकार म्हणून पावसाळी अधिवेशनास जाण्याची संधी मिळाली. हे पावसाळी अधिवेशन जून २०२४ रोजी होते. या अधिवेशवनात मी पूर्ण कालावधी साठी वृत्तांकन केले. खरे तर मी दै .प्रहारचे मुख्य संपादक सुकृत खांडेकर, मनीष राणे सर, नाशिक विभागाचे संपादक कडलग सर यांच्यामुळे मला हि संधी मिळाली. संधीचे सोने करायचे म्हणून मी पहिल्या दिवसापासून विधानभवनात हजर होतो. येथील प्रत्येक अनुभव मी शब्दांकित करण्याचे ठरवले. विधानभवनात पास काढण्यापासून ते शेवटच्या दिवसा पर्यंत मी हा अनुभव शब्दांकित केल...

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावात खाजगी ट्रस्ट चे अवैध कारनामे

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे खाजगी ट्रस्ट चे अवैध कृत्य... तब्बल 17.62 हेक्टर क्षेत्रावर या ट्रस्ट चे अतिक्रमण मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर 11 या सरकारी जागेत शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट ने अतिक्रमण करून शासनाला फसवून शासनाचा निधी चा गैर वापर केला असून यांची चौकशी होणे गरजेचे आहे. राजसत्ता न्यूज च्या हाती लागलेल्या पुराव्या नुसार या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसत आहे. संबंधित प्रशासनाने अद्याप पर्यंत कारवाई का केली नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. जवळपास 2010 पासून या ट्रस्टने अनधिकृत ताबा या जमिनीवर घेतला आहे. आज ही धार्मिकतेच्या नावाखाली या ट्रस्टने अतिक्रमण केले.. आता मात्र तेथील सर्वच जमीन जवळपास 40 ते 45 एकर वर या ट्रस्टने अनधिकृत ताबा घेतला आहे.  सविस्तर वृत्त असे की संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी लगत गट नंबर 11 हा सरकार म्हणून आहे. परंतु या ठिकाणी शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट ने अनधिकृत ताबा घेतला आहे. व तसेच शासनाला फसवून या जागेवर मुबलक निधी उपलब्ध करून या जागेवर अतिक्रमण केले आहे.  सध्या गोरगरीब जनतेला राहण्यासाठी निवारा ना...

शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट अपहार

मांडवे बुद्रुक येथील त्या ट्रस्ट संबंधित आणखी एक धक्कादायक बातमी समोर.. संबंधित ट्रस्ट ची झोलझाल समोर आली आहे. करोडो रुपयाचा निधी शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून लाटल्याचे समोर.. बघुयात सविस्तर वृत्त सुनील इघे यांनी शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट च्या विरोधात उपोषण पुकारले आहे. तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री, पालकमंत्री धर्मादाय आयुक्त यांना दिले आहे. सदर उपोषण हे 3 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. याच निवेदनाची दखल घेत महसूल प्रशासनाने सदर अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी केली. जागेवर सदर ट्रस्ट ने मोठे अतिक्रमण केल्याचे महसूल पथकाला निदर्शनास आले आहे. आता महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.  या ट्रस्ट चा आणखी एक बोगस कारभार उघड झाला आहे. मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर 11मध्ये जागा हस्तानातरित नसताना देखील करोडो रुपयाचा निधी पर्यटन खात्याकडून आणला असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे पत्र राजसत्ता न्यूज च्या हाती लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी यांनी कुठलीही चौकशी न करता या जागेवर टेंडर काढले की खोटे द...

लेडी डॉन

संगमनेर करहो सावधान..! संगमनेर मध्ये आली आहे लेडी डॉन... आधी हाय... मंग काय.... नंतर बाय... पण असे बाय नाही लाखो रुपयांना चुना लावून बाय... पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या या युट्युबर व तोतया पत्रकारावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  सुरुवात कशी होते बघा..हाय काय झाल्यावर सर चला ना चहा घेऊ.. मंग एका हॉटेल मध्ये चहा प्यायला न्यायचे.. नंतर गुपचूप फोटो काढून घ्यायचा... असे एकदा नव्हे तर किमान दोन तीन वेळेस करायचं... भाऊ आहात दादा आहात असे नात्यात गुरफाटायचे आणि नंतर रात्री अपरात्री फोन करायचा अडचणीत आहे आई आजारी आहे.. बाबा आजारी आहे... खूप टेंशन मध्ये आहे.. दहा हजाराची गरज आहे... आत्महत्या करावी वाटते... आशा गप्पा मारायचा... नंतर मी तुझ्या बायकोला हे असे फोटो दाखवेल.. तूझा माझा रात्री दीड दोनला फोन झाला..कश्यासाठी एवढ्या रात्रीला फोन केला.. आपले प्रेम आहे म्हणून ना... अशी सुरुवात होत असते... त्यामुळे दर्शकहो सावधान.. या महिलेने अद्याप पर्यंत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, शासकीय अधिकारी, पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित लोकांना गंडा घातला आहे.  पाच लाख रुपयांची खंडण...

भालचंद्र नेमाडे यांनी ओकलेली गरळ पण बोलवते धनी कोण

Image
भालचंद्र नेमाडे यांचे बेताल वक्तव्य म्हणजे गाढवाने कथन केलेली कथा  संपादक: सहदेव जाधव  दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यांची जीभ घसरली. ही जीभ घसरली आणि अखंड हिंदुस्थान चा अवमान झाला. आता त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब, पेशवे यांच्या संदर्भात नेमाडे यांनी ही वक्तव्य केली. औरंगजेबाला सर्वोच्च दर्जा देताना आपली 'साठी बुद्धी नाटी' झाल्याचे स्पष्टीकरण यावेळी नेमाडे यांनी देऊन टाकले. या माध्यमातून त्यांनी इतिहासाची पाने चुरगळून बीनअकलेचे तारे मोजले.  ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरुन हा मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या सोशल मीडिया आणि कायदेशीर सल्लागार सेलचे प्रमुख आशुतोष दुबे यांनी सोमवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात भालचंद्र नेमाडे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यानी केलेल्या काही वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. आशुतोष दुबे यांनी भालचंद्र नेमाडे याच्यावर हिंदू ब्राह्मणांच्या भावना दुखावण, ल...

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार

Image
  संभाजी भिडे गुरुजी म्हणजे हिंदुत्वाची धगधगता ज्वालामुखी संपादकीय : सहदेव जाधव    भिडे गुरुजींना अटक करणे म्हणजे साक्षात सूर्याला गिळायला निघाल्यासारखे             शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर  सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.   संभाजी भिडे गुरुजीनी वक्तव्य करण्याचं आणि त्यावरून वाद होण्याची ही पहिली वेळ नाही.  त्यांनी याआधीही अशी काही वक्तव्यं केली आहेत.  मनोहर भिडे यांचा जन्म १० जून १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला आणि आज त्यांना संभाजी भिडे किंवा गुरुजी म्हणूनही ओळखले जाते . पुणे, सांगली,  कोल्हापूर , बेळगाव, मुंबई आणि सातारा येथे संभाजी भिडे पूजनीय आहेत. आणि त्यांचे अनुयायी मोठे आहेत.  संभाजी भिडे गुरुजी सांगलीत राहतात. त्यांचं वय 80 वर्षे आहे. त्यांचे मूळ नाव मनोहर असं आहे. भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे. भिडे गुरुजी अनेक तरुणांचे हृदय सम्राट आहेत. भिडे गुरुजींना अटक सध्या तरी अश्यक्य आहे.            ...